वातानुकुलित स्टुडिओमध्ये चित्रीकरण करण्यापेक्षा मोकळ्या हवेत,हिरवळीने वेढलेल्या आणि मोकळ्या आसमंता खाली काम करण्याचा अनुभव काही वेगळाच असातो. तेवढाच तो आव्हानात्मक असतो. दीपक राणे फिल्म्स आणि इंडियन फिल्म फॅक्ट्रीच्या मराठी - कन्नड सिनेमाचं शूटिंग कर्नाटकात वेगवेगळ्या भागात सुरु आहे.मग ते रामगढच पठार असेल किंवा उडुपी जवळच हेबरी,चिकमंगलोर जवळचं बाबा भूदानगिरी, प्रत्येक लोकेशन
वेगवेगळे होते. घनदाट जंगल, चढ उतारचा ट्रेक, नक्षल भागाचे आव्हान अशा वेगवेगळ्या परिस्थितीत या सिनेमाचं शूट झाले आहे.